Advertisement
मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये 'अब की बार 400 पार'ची घोषणा देणाऱ्या भाजपा आणि मित्र पक्षांना मनासारखं यश मिळवता आलं नाही. त्यामुळेच भाजपा आणि मित्र पक्षांना केंद्रात सत्ता स्थापन करुन नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची हॅटट्रीक करण्यासाठी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंची मदत घ्यावी लागली. हे दोघे त्यांची बील पास करण्यासाठी भाजपसोबत थांबले आहेत. त्यानंतर हे दोघे भाजपचा पाठिंबा काढून घेऊ शकतात, त्यामुळे भाजप पुढची रणनीती आखत आहे. शरद पवार आणि ठाकरे यांच्या खासदारांची संख्या त्यासाठी पुरेशी आहे. असा मोठा दावा माजी मंत्री बच्चू कडू यांनी केला आहे.
माजी मंत्री कडू यांनी आपलं म्हणणं मांडताना ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांचाही उल्लेख केला आहे. खासदार संजय राऊत यांची वक्तव्य सुद्धा बदलू लागली आहेत. आपले खासदार आमदार पक्ष सोडून जाऊ नयेत यासाठी राऊत यांचा प्रयत्न सुरू आहे, असं कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांनी दोन्ही विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा उल्लेख करताना या दोन्ही नेत्यांची गरज भाजपासाठी संपल्याचा दावा केला आहे. "एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची गरज भाजपासाठी संपलेली आहे.
