Advertisement
धाराशिव : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओम राजे निंबाळकर हे पक्षाला 'जय महाराष्ट्र'करणार अशी चर्चा सोशल मीडियात रंगली होती. दरम्यान, या बंडाळीच्या वृत्ताला दुजोरा देणारी पोस्ट सोशल मीडियात पाहायला मिळाल्या. यावर ओमराजे निंबाळकर यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया आली नव्हती. पण, आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची आणखी एक पोस्ट सोशल मीडियात चर्चेत आली आहे. आनंद दिघे साहेब यांना जयंतीनिमित्त अभिवादन करतानाच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा फोटो काढला आहे. ओमराजे निंबाळकर हे महायुतीचे असल्याचे सांगत ते लवकरच प्रवेश करतील असा दावा काल प्रताप सरनाईक यांनी केला होता. ठाकरेंच्या शिवसेनेचे काही नेते आपल्या संपर्कात असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले होते. दरम्यान, प्रताप सरनाईक आणि उदय सामंत यांच्या दाव्याला दुजोरा देणारी पोस्ट पाहायला मिळत आहे. ओमराजे यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट खूप काही सांगणारी आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी मशाल ठेवली मात्र उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना वगळले आहे.
