Advertisement
प्रयागराज : महाकुंभात आपला माल विकण्यासाठी दूरदूरवरून लोक येत आहेत. अशीच एक इंदूरमधील मोनालिसा नावाची १६ वर्षीय तरुणीही महाकुंभ मेळ्यात माळा विकण्यासाठी आली आहे. या माळा विकणाऱ्या मुलीच्या सौंदर्याची सगळीकडेच चर्चा आहे. त्यामुळे तिच्यावर अनेक रिल्स बनवले जात आहेत. या रीलवरही यूजर्स खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
काजळ घातलेले सुंदर डोळे आणि डस्की त्वचा असलेल्या मुलीचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. एका व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. त्या मुलीचे सौंदर्य टिपण्यासाठी इंस्टाग्राम रील्ससाठी कॅप्चर करण्यासाठी पुरुष युट्युबर कॅमेरासह रांगेत उभे आहेत. ती निघत जात आहे तरी तेव्हा फोन आणि कॅमेरे घेऊन उभे असलेले तरुण तिच्या मागे जात आहेत. यामुळे नेटकरी ही तिची स्तुती आहे की हा तिचा छळ आहे? असा प्रश्न करत आहेत. मोनालिसाचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये ती तिचे नाव आणि पत्ता सांगण्यासोबतच तिला विचारलेल्या लग्नाच्या प्रश्नांची उत्तरेही देताना दिसत आहे.
