Advertisement
अंजली दमानिया यांचा खळबळजनक आरोप
मुंबई : नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीसाठी अंजली दमानिया यांनी ऑनलाईन ऑर्डर केली होती. मात्र, धनंजय मुंडेंच्या दबावामुळे ऑनलाईन कंपनीनं ऑर्डर थांबवल्याचा आऱोप दमानिया यांनी केला आहे. तसेच पुन्हा एकदा अंजली दमानिया धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाल्या आहेत. घरापर्यंत आलेली ऑर्डर धनंजय मुंडेंच्या दबावामुळे परत गेल्याचं कंपनीकडून सांगण्यात आल्याचा आरोप दमानियांनी केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडेही काहीही करू शकतात, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. मंत्री ठरवणार का राजीनामा द्यायचा की नाही? असा संतप्त सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, सुरेश धस प्रकरणी राऊतांच्या वक्तव्यानंतर दमानियांनी प्रतिक्रिया दिली. धसांचा वापर भाजपने करून घेतला असं वक्तव्य राऊतांनी केले.मात्र, सुरेश धसांनी मुंडेंचा वापर करून घेतल्याचा आरोप दमानियांनी केला आहे. हा मुद्दा उचलला की धनंजय मुंडेंसोबत तडजोड करता येईल असं धसांना वाटलं होतं आणि मिळून मिसळून लुटता येईल अशी त्यांची चाल होती असा आरोप दमानियांनी केला आहे.
