#

Advertisement

Friday, February 14, 2025, February 14, 2025 WIB
Last Updated 2025-02-14T17:41:40Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

लाडकी बहीण योजना बंद होणार?

Advertisement

उदय सामंत यांनी केलं स्पष्ट 

मुंबई : लाडकी बहीण योजनेवर सुप्रीम कोर्टानेताशेरे ओढल्यानंतर लाडकी बहीण योजनेचं काय होणार याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थिती झाले आहेत. अशात लाडकी बहीण योजनेबद्दल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.सूर्य चंद्र असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असं विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केल आहे. विरोधकांकडून योजना बंद होणार असल्याचा महिलांमध्ये संभ्रम पसरवण्याचं काम सुरु असल्याचं ही त्यांनी म्हटल आहे. 

सुप्रीम कोर्टाने ओढले ताशेरे 
लाडकी बहीण’ योजनेचा आर्थिक भार महाराष्ट्र सरकारला झेपत नाही व आता निवडणुका जिंकून झाल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींची गरज संपली आहे. हे तर कधीतरी होणारच होते, पण इतक्या लवकर होईल असे वाटले नव्हते. लोक आळशी बनले आहेत. लोक काम करायला तयार नाहीत. त्यांना फुकट राशन व महिन्याला पैसे मिळू लागले आहेत. त्यामुळे संपूर्ण समाजरचनाच बिघडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे परखडपणे सांगितले. महाराष्ट्रासह संपूर्ण देश कर्जाच्या ओझ्याखाली दडपून गेला आहे. भारताची अर्थव्यवस्था ही 205 लाख कोटी कर्जाच्या ओझ्याखाली गुदमरून तडफडते आहे. भारताचे कर्ज सतत वाढत आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यावर साधारण साडेसहा लाख कोटींचे कर्ज आहे.