Advertisement
मुंबई : दिशा सालियन हिच्या हत्येप्रकरणात आता नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. सतीश सालियन यांनी कोर्टात याचिका दाखल करून अनेकांवर गंभीर आरोप केला आहे. आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच दिशा सालियन प्रकरण हे सीबीआयकडे सोपवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दिशा सालियनच्या मालाडमधील घरी आधीपासूनच पार्टी सुरू होती असा याचिकेत उल्लेख. त्यावेळी तिथे एक ग्रुप आला. ज्यामध्ये रोहन राय आणि त्यांचे मित्र होते. यावेळी अचानक आणखी काही लोक आले. ज्यामध्ये आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनू मौर्या, आदित्य ठाकरे यांचे बॉडीगार्ड्स आणि आणखी काही लोक आले असा याचिकेत उल्लेख. यानंतर दिशा सालियानचा सामूहिक बलात्कार झाला असा याचिकेत दावा आहे.
याचिकेतील प्रमुख मागण्या कोणत्या?
- आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा.
- किशोरी पेडणेकर यांच्यावर कुटुंबियांवर दबाव टाकून दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा.
- पारदर्शक तपास होण्यासाठी राज्याबाहेर तपास होऊ द्यावा.
- दिशाच्या पोस्टमार्टेम करतानाचे चित्रीकरण आणि सर्व कागदपत्र समोर आणावीत.
- आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, दिनू मोर्या, मुंबई पोलीस आयुक्तांचे आणि आदित्यचे बॉडीगार्डचे घटनेदरम्यानचे मोबाईल टॉवर लोकेशन काढण्यात यावे.
- दिशा सालियनचा फोन आणि लॅपटॉप तिचा बॉयफ्रेंड रोहन रायकडे देण्यात आला आहे. तो कुटुंबीयांकडे सोपवावा.
