#

Advertisement

Wednesday, April 16, 2025, April 16, 2025 WIB
Last Updated 2025-04-16T11:22:56Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

'मी अजित पवारांना कार्यक्रमाला बोलावणार नाही'

Advertisement

भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य 
पुणे : अहिल्यादेवींच्या जयंतीचं अजित पवारांना निमंत्रण देणार नाही अशी भूमिका गोपीचंद पडळकर यांनी घेतली आहे. महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमात अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. गोपीचंद पडळकर यांनी हा सरकारी कार्यक्रम नसल्याचा युक्तिवाद केला आहे. मात्र तरीही त्यांच्या या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या 300 व्या जयंतीनिमित्त तब्बल 50 हजार धनगरी ढोल वाजवून अभिवादन करण्यात येणार आहे. पुण्यात मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात हा कार्यक्रम होणार आहे. अमित शाह यांनी या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केल्याचं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे. कोणाकोणाला या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं हे त्यांनी सांगितलं .मात्र यात अजित पवारांचं नाव त्यांनी घेतलं नाही. याबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी आपण अजित पवारांना बोलावणार नसल्याचं स्पष्ट केलं. 
यामागील कारण विचारलं असता त्यांनी सांगितलं की, हा सरकारचा नाही, तर धनगरांचा कार्यक्रम आहे. धनगरांनी ठरवलेला कार्यक्रम आहे. सरकारची कोणतीही मदत घेऊन आम्ही हा कार्यक्रम करत नाही. हा पूर्णपणे धनगर समाजाचा कार्यक्रम आहे.