#

Advertisement

Friday, April 11, 2025, April 11, 2025 WIB
Last Updated 2025-04-11T12:24:52Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोन्याने गाठला सर्वाधिक उच्चांकी दर

Advertisement

मुंबई : सोन्याने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. सोनं आता थेट 95 हजारांपार गेलं आहे. सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दारात प्रति तोळा हजार रुपयांनी तर दोन दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 3000 रुपयांनी वाढ झाली आहे. सुवर्ण बाजाराच्या इतिहासात सोन्याने सर्वाधिक उच्चांकी दर गाठला आहे.
आज सोन्याचा दर 95 हजार 200 प्रति तोळे (जीएसटी सह) झालेला आहेत. तर चांदीच्या दरात आज कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही.
अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या व्यापार युद्धाचा परिणाम सोन्याच्या बाजारावर होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अनियमित्ता असल्याने गुंतवणूकदारांचा कल सोन्याच्या गुंतवणुकीकडे वाढला आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातीला टेरिफ वॉर अजून सुरू राहिल्यास सोन्याचे दर एक लाख पार होण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.