#

Advertisement

Monday, May 5, 2025, May 05, 2025 WIB
Last Updated 2025-05-05T14:39:15Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

ओअ‍ॅसिस स्कूलचा १२वी परीक्षेत १०० टक्के निकाल

Advertisement

संचालिका अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन 

भोसरी : येथील इंद्रायणी नगर मधील शाहु शिक्षण संस्था संचलीत ओअ‍ॅसिस स्कूलचा १२वी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. स्कूलमधील विज्ञान शाखेतील एकुण ६५ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती, यामध्ये सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, सर्व शिक्षकांमुळे हे यश मिळाले असल्याचे विद्यालयाच्या संचालिका अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले. 

ओअ‍ॅसिस स्कूलमधील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे. निकीता रघुविर ढिगळे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांकाने उत्तीर्णी होत ८१. ६७ टक्के गुण मिळवले आहेत. नेहा संजय बोधाणे हिने द्वित्तीय क्रमांक मिळवीत ८१ टक्के गुण मिळविले तर तृत्तीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या वैष्णवी राजू जगताप ७८ टक्के गुण मिळाले आहेत. वाणिज्य शाखेतील २० पैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विनय विक्रम रजपूत याने वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक मिळवीत ७९ टक्के गुण मिळवले. तर, द्वित्तीय क्रमांकावर निलम अंबाणा अग्रखेड हिने ७४.८३ टक्के गुण मिळवले आहेत. तृत्तीय क्रमांकावरील हितेश माळी याने  ७३.८३ टक्के गुण मिळवले आहेत.  याशिवाय कला शाखेतून परिक्षा देणारे विद्यार्थीही बारावी परिक्षेत चांगले चमकले आहेत. तनीष्का लांडे हिने प्रथम क्रमांकावर ६४.८३ गुण मिळवले तर द्वितीय क्रमांकावर रेश्मा राठोड हिने ६०.८३ टक्के गुण मिळवले आहेत. तृत्तीय क्रमांकावरील भूमिका जोगदंड हिने ५३. १७ टक्के गुण मिळवले आहेत. शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रा.  लक्ष्मणराव ढोबळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी तसेच शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. यावेळी संचालक अजय साळुंखे, पर्यवेक्षक विशाल खंदारे, प्राचार्य रामेश्र्वर फिस्के आणि शिक्षक यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे काैतूक केले.