#

Advertisement

Saturday, May 31, 2025, May 31, 2025 WIB
Last Updated 2025-05-31T11:27:30Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

हगवणेच्या पोलीस कोठडीत वाढ

Advertisement


वैष्णवी हगवणे प्रकरणी दोघांनाही 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अटकेत असलेला सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. दोघांनाही 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. निलेश चव्हाण आणि राजेंद्र चव्हाण या दोघांची समोरासमोर चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती. त्यासाठी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे ला तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबीयांचा निकटवर्तीय असून त्याचा कुटुंबीयांवर खूप प्रभाव होता, असं संशय पोलिसांना आहे. त्याने वैष्णवीच्या बाळाला संभाळायची जबाबदारी कशी दिली? याचा तपास पोलिसांना करायचा आहे. त्यामुळं पोलिसांनी कोर्टाकडे पोलीस कोठडीची मागणी केली होती. कोर्टाने ही मागणी मान्य करत 3 जूनपर्यंत निलेश चव्हाण याला पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश विक्रांत खंदारे यांनी हा निर्णय सुनावला आहे.