#

Advertisement

Thursday, May 29, 2025, May 29, 2025 WIB
Last Updated 2025-05-29T12:38:04Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शशांक हगवणेचे मामा आयपीएस जालिंदर सुपेकरांना गृह विभागाचा मोठा दणका

Advertisement

पुणे : आयपीएस जालिंदर सुपेकर यांना गृहविभागानं मोठा दणका दिला आहे, जालिंदर सुपेकर यांच्याकडून कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपांनंतर जालिंदर सुपेकर यांचा अतिरिक्त पदभार काढल्याची माहिती मिळत आहे. जालिंदर सुपेकर हे वैष्णवीचा पती शशांक हगवणे याचे मामा आहेत.
जालिंदर सुपेकर यांचं नाव वैष्णवी हगवणे प्रकरणात सातत्यानं येत होतं, आणि त्यांच्यावर आरोप देखील केले जात होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील जालिंदर सुपेकरांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आता त्यांच्याकडील कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढण्यात आला आहे. त्यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे, त्यांची पुणे विभागात बदली करण्यात आली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात त्यांच्यावर सातत्याने आरोप करण्यात येत होते, हगवणे कुटुंबातील सूनांचा छळ होत असताना हगवणे कुटुंबाला मदत केल्याचा आरोप सुपेकरांवर होत होता. या सर्व पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याचं बोललं जात आहे, ही जरी नियमीत बदली असली तरी देखील सुपेकर यांना हे प्रकरण भोवल्याचं बोललं जात आहे.