#

Advertisement

Monday, May 12, 2025, May 12, 2025 WIB
Last Updated 2025-05-12T12:54:51Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भारताच्या अर्थव्यवस्थेवर युद्धामुळे कोणताच परिणाम नाही

Advertisement

सीआयआय अंदाज : भारताच्या जीडीपीचा ग्रोथरेट 6.5 टक्क्यांपेक्षा अधिक 

मुंबई :  पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या हल्ल्यात जवळपास 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले, त्यानंतर आता पाकिस्तान पुन्हा एकदा असा भ्याड हल्ला करण्याचा विचारही करणार नाही.
भारतानं आपल्या अटींवर युद्धविरामाची घोषणा केली आहे. पाकिस्तानला चीनकडून देखील मदत करण्यात आली, चीनकडून पाकिस्तानला युद्धसामग्री पुरवण्यात आली, मात्र ही सर्व शस्त्र भारताविरोधात कुचकामी ठरली आहेत.
दुसरीकडे युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे, भारतासाठी गुडन्यूज आहे. मात्र यामुळे चीन आणि पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट होणार आहे. सीआयआयनं वर्तवलेल्या अंदाजानुसार भारताच्या जीडीपीचा ग्रोथरेट 6.5 टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. देशात सध्या उद्धभवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारताची अर्थव्यवस्था पुरेशी सक्षम असल्याचं सीआयआयचे अध्यक्ष संजीव पुरी यांनी म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे पुन्हा एकदा कर्ज घेण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे. आयएमएफकडून पुन्हा एकदा पाकिस्तानला 100 कोटी डॉलरचं कर्ज देण्यात आलं आहे.