Advertisement
मंगळवेढा तहसील कार्यालयात ध्वजारोहण
मंगळवेढा : संयुक्त महाराष्ट्राच्या ६६ व्या स्थापना दिवसाच्या औचित्याने आयोजित मंगळवेढा तालुक्याचे मुख्य शासकीय तहसील कार्यालयातील ध्वजारोहणास प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री, माजी मंत्री प्रा.डॉ. लक्ष्मणराव ढोबळे उपस्थिती होते. त्यानी आपल्या शब्दवाणीतून महाराष्ट्राच्या इतिहासाच्या विविध पैलांना स्पर्श करीत सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढा देणाऱ्या असंख्य हुतात्म्यांच्या स्मृतीला आदरांजली अर्पण करून महाराष्ट्राची समृद्ध परंपरा, सामाजिक ऐक्य आणि प्रगतीशील विचारसरणीचा अभिमान बाळगूया, अशी भावना प्रा.डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केल्या.
यावेळी धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे, प्रांताधिकारी बी.आर. माळी, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, प्र.तहसीलदार जाधव, मुख्याधिकारी चरण कोल्हे, गटविकास अधिकारी योगेश कदम यांच्यासह सहकारी तसेच शासकीय प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.