Advertisement
पुणे : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणानंतर हुंडा आणि हुंड्यामुळे बळी गेलेल्या वैष्णवी हगवणेची चर्चा आहे. या प्रकरणानंतर हुंडा, हुंडाबळी हे शब्द चर्चेत आहेत. पण हुंडा हा शब्द आला कुठून?
हुंडा हा शब्द लॅटिन शब्द डोटारे या शब्दावरुन तयार झाला आहे. त्याचा मूळ अर्थ आहे देणे किंवा वाटून देणे असा आहे. संस्कृतमध्ये याला दहेज, उर्दूमध्ये जाहेज, लॅटिनमध्ये डोटारे, इंग्रजीत डावरी असं म्हणतात. वधूच्या कुटुंबाकडून वराच्या कुटुंबाला लग्नाच्या वेळी दिलेली मालमत्ता असा त्याचा मूळ अर्थ आहे. भारतात हुंडा या शब्दाची मुळे मध्ययुगीत काळात आहेत. जेव्हा लग्नानंतर वधूचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी तिच्या कुटुंबाकडून रोख किंवा वस्तू स्वरुपात भेटवस्तू दिली जात असे. युरोप, भारत, आफ्रिका आणि जगाच्या अन्य भागात हुंडा पद्धतीचा मोठा इतिहास आहे. ब्रिटिशांनी हुंडा देण्याची प्रथा बंद केली.
हुंडा आणि स्त्रीधनात अनेकजण गल्लत करतात. ते एकसारखेच आहे असे अनेकांना वाटते. पण यामध्ये खूप फरक आहे. महिलेवर स्त्रीधनवर एका महिलेचा पूर्ण अधिकार आहे. पती किंवा कुटुंब एखाद्या महिलेच स्त्रीधन ताब्यात घेऊ शकत नाही. हुंडा म्हणजे लग्नाच्या वेळेला वधूकडून वराच्या कुटुंबाला दिले जाणारी रोख रक्कम किंवा भेटवस्तू असते. हुंडा देणे किंवा घेणे कायद्याने गुन्हा मानला गेला आहे. हुंडा बंदी कायदा १९६१ लागू केला आहे.
सदर कायद्याच्या कलम ३ नुसार हुंडा घेणाऱ्यास ५ वर्षें सक्त मजुरी आणि रु. १५०००/- पर्यंत दंडाची शिक्षा आहे. हुंडा मागणे हा देखील गुन्हा असून त्यासाठी ६ महिने पर्यंतची कैद आणि रु. १००००/- दंडाची शिक्षा आहे. जर एखाद्या मुलीच्या लग्नाच्या सात वर्षाच्या आत असामान्य परिस्थितीमध्ये ती मरण पावली तर हे सिद्ध केले जाते की मरणाआधी तिला हुंड्यासाठी तिला त्रास दिला जात होता. यात भारतीय दंड संहिताच्या कलम ३०४-बीच्या अंतर्गत मुलीचा पती आणि नातेवाईक यांना कमीत कमी सात वर्ष ते आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते.
महाराष्ट्रात हुंडा विरोधी कायदा असूनही ही प्रथा आजही सुरु आहे. आजही महाराष्ट्रात अनेक हुंड्यामुळे महिलांचा बळी जात आहे. देशात सुमारे दर एका तासात एक महिला हुंडा संबंधी कारणांनी मरण पावते आणि वर्ष २००७ ते २०११ च्या मध्ये या प्रकाराच्या प्रकरणात खूप वृद्धि झाली. राष्ट्रीय अपराध रिकॉर्ड ब्यूरोचे आंकड़े सांगतात की विभिन्न राज्यातून वर्ष २०१२ मध्ये हुंड्यासाठी हत्याचे ८,२३३ प्रकरण समोर आले.