#

Advertisement

Wednesday, May 28, 2025, May 28, 2025 WIB
Last Updated 2025-05-28T13:07:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आरोपी निलेश चव्हाण यांच्या विरोधात "स्टँडिंग वॉरंट"

Advertisement

पुणे : वैष्णवी हगवणे नावाच्या पुण्यातील तरुणीने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं, सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी तिचा सासरा, सासू, पती, दीर आणि नणंद यांना अटक केली आहे, मात्र अजूनही एक आरोपी फरारच आहे. निलेश चव्हाण असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे.
दरम्यान निलेश चव्हाण याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे, मात्र तो अजूनही पोलिसांच्या हाती लगालेला नाही, सुरुवातीला निलेश चव्हाण याच्या शोधासाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र आता पोलिसांनी निलेश चव्हाणच्या शोधासाठी आणखी तीन पथकांची नियुक्ती केली आहे. पोलिसांच्या सहा पथकांकडून निलेश चव्हाण यााच शोध सुरू आहे. त्यानंतर आता पोलिसांनी फरार असलेल्या निलेश चव्हाण याच्यावर मोठी कारवाई केली आहे. आरोपी निलेश चव्हाण यांच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट काढण्यात आलं आहे, त्यामुळे आता त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. 

स्टँडिंग वॉरंट म्हणजे काय?
आपली ओळख लपवून जर एखादा आरोपी फरार असेल तर त्याच्या स्थावर आणि जगंम मालमत्तेची जाहीर उद्घोषणा केली जाते आणि मालमत्ता जप्त करण्यात येते, पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आता चव्हाणच्या अडचणी वाढल्या आहेत.