Advertisement
वैष्णवी हगवणे प्रकरणात चित्रा वाघ यांनी केली भूमीका स्पष्ट
मुंबई :भाजपाच्या फायरब्रांड नेत्या चित्रा वाघ यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील कोणाही सोडले जाणार नाही हे सांगताना त्यांनी पार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या ताटाच जेवणारा जरी माणूस यात असेल तरी त्याला सोडले जाणार नाही, असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.
वैष्णवीचे ताटात जेवणारा माणूस असू दे,ताटात जेवणारा माणूस असू दे,सासू सासरे तर मला 21 व्या शतकातील हरामखोर सासू सासरे दिसत आहेत. मला त्याचा प्रचंड संताप येतोय. वैष्णवी हीचा मेल्यानंतरही वनवास संपलेला नाही. बाईच्या नशीबी संघर्ष मेल्यानंतरही आहेच. हरामखोर लांडगे लचके तोडत आहेत. आपली सामाजिक जागृती करण्याचा जबाबदारी आहे. वैष्णवी हगणवे यांच्यानंतरही अनेक केसेस पुढे आलेल्या आहेत. पोलिस आरोपींना पकडत आहेत असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
वैष्णवीची जाऊ मयुरी जगताप प्रकरणात महिला आयोग नाही तर इतर यंत्रणांची चौकशी व्हायला पाहिजे. पोलिस , महिला आयोग , भरोसा सेल असेल कुणीही कसूर केली असेल तरी कारवाई होणारच. महिला आयोगाने जर कारवाई केली नाही तरी त्यांच्यावर कारवाई होईल असेही वाघ यांनी म्हटले आहे.
