Advertisement
नाशिक : जिल्ह्याला एक दोन नव्हे अवघी चार मंत्री पद मिळाली आहेत. अन्न नागरी पुरवठा मंत्री म्हणून छगन भुजबळ यांना आज राज्यपाल भवनात शपथविधी करण्यात आला. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता चार मंत्री झाल्यानं नाशिकचा विकास होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
महायुतीच्या सरकारमध्ये नरहरी जिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यांना संधी देत छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं. अजित पवार यांनी उचललेल्या या पावलामुळे राजकीय क्षेत्रात मोठा गोंधळ उडाला. भुजबळ यांनी अजित पवार यांना लक्ष करत टीका केली त्यांच्या कार्यकर्त्यांनी पवारांचे पुतळे ही जाळले. मात्र पुन्हा एकदा त्यांच्यात समेट घडवत धनंजय मुंडे यांच्या जागी त्यांना मंत्रीपद जाहीर करण्यात आल आहे. अजित पवार वादावर पडदा टाकत भुजबळांनी ऑल इज वेल असल्याचं सांगत जणू काही घडलेच नसल्याचं समोर आलं. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच कार्यकर्त्यांनी आज अजितदादा एकच वादा घोषणा देत फटाके फोडले. नाशिकच पालकमंत्रिपद त्यांनाच मिळावं अशीही मागणी त्यांनी केल्याने भुजबळ यांची नवीन इच्छा समोर आली आहे. अजित पवार यांच्यासोबतच वाद ही संपुष्टात आल्याचं कार्यकर्ते म्हणत आहेत. आता, या वादात नाशिकमध्ये तीन तिघाड काम बिघाड, अशी परिस्थिती निर्माण न होता तातडीने निर्णय होणे अपेक्षित आहे.
