#

Advertisement

Wednesday, May 21, 2025, May 21, 2025 WIB
Last Updated 2025-05-21T11:37:34Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

You Tuber ज्योती मल्होत्राचं ISI एजंटसोबतचं प्रायव्हेट चॅट समोर

Advertisement

दिल्ली : पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हरियाणाच्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचं  पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांची असणारं नातं सध्या अनेक चर्चांना वाव देत असून, त्यातूनच ज्योतीचा पाकिस्तनातील वावर तिच्या हेरगिरीच्या आरोपांसाठीचे ठोस पुरावे टप्प्याटप्प्यानं समोर आणत आहे.
दानिश अलीसोबतचं ज्योतीचं बोलणं, तिचं सतत पाकिस्तानात जाणं, तिथं दहशतवादी तळावर कथित स्वरुपात मुक्काम करणं हे असे पुरावे समोर येत असतानाच आता आणखी एक महत्त्वाच्या गोष्टीचा खुलासा झाला आहे. पाकिस्तानातील गुन्हे शाखेच्या अली हसन याच्यासोबतचा तिचा आणखी एक व्हॉट्सअॅप चॅट नुकताच समोर आला आहे.
अली हसन- माझ्या मैत्रिणी.. माझे मन नेहमीच प्रार्थना करतें की तू आनंदी राहा. नेहमी हसत आणि हसवत राहा... तुला आयुष्यात कधीही दुःख होणार नाही.
यानंतर ज्योतीने अली हसनला हसणारा इमोजी पाठवला आणि त्याला सांगितलं...
ज्योती- माझे लग्न पाकिस्तानात कर.

अलीकडे थेट लग्नाचा विषय काढण्याच्या ज्योतीच्या या मेसेजमधून आणि या दोघांच्या या गप्पांमधून हे स्पष्ट होतंय की ज्योतीचं पाकिस्तानशी भावनिक नातंही होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्योती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या अधिकारी अली हसनसोबत सतत संपर्कात होती आणि त्यांच्याशी तिचं बऱ्याचदा बोलणं होत होतं. |
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, तपासादरम्यान पोलिसांना ज्योतीच्या 4 बँक खात्यांबद्दल माहिती मिळाली. यामध्ये एका बँक खात्यात दुबईहून झालेला व्यवहारही आढळला. तपास यंत्रणा आता ज्योतीच्या सर्व बँक खात्यांची तपासणी करत आहे आणि तिच्या खात्यात पैसे कुठून येत होते हेसुद्धा शोधण्याचा प्रयत्न करत आहे. 

'आम्ही बोलण्यास सुरुवात केली'
ज्योतीनं तिच्या जबाबात दिलेल्या माहितीनुसार तिथं तिची भेट एहसान-उर-रहिम म्हणजेच दानिशशी झाली आणि त्यानं, मी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले, आम्ही बोलण्यास सुरुवात केली. पुढे ज्योतीनं पाकिस्तानात दोनदा भेट दिली आणि तिथं दानिशनं तिची भेट अली हसन नावाच्या त्याच्या सहकाऱ्याशी घडवून आणली.