#

Advertisement

Friday, June 13, 2025, June 13, 2025 WIB
Last Updated 2025-06-13T12:05:45Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

'ती' 10 मिनिटं जीव वाचवणारी ठरली

Advertisement

भूमी चौहान या तरुणीची फ्लाईट चुकल्याने ती वाचली

अहमदाबाद : विमान दुर्घटनेत 240 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामधील एक प्रवासी रमेश विश्वासकुमार विमानात प्रवास करत होता. तर भूमी चौहान या तरुणीची फ्लाईट चुकल्याने ती वाचली आहे. भूमी चौहान या तरुणीला अहमदाबादमधील वाहतूक कोंडीने वाचवलं आहे. वाहतूक कोंडीत अडकल्याने भूमी 10 मिनिटं उशिराने सरदार वल्लभभाई विमानतळावर पोहोचली होती. यामुळे तिला विमानात बोर्डिंग करण्याची परवानगी देण्यात आली नाही.
भूमीने सांगितलं की, मी बाहेर आल्यानंतर मला दुर्घटनेची माहिती मिळाली. यानंतर माझे पाय थरथरायला लागले होते. फार वेळ तिला मानसिक धक्का बसला होता. तिने सांगितलं की, विमान सुटल्याने आपण नाराज होऊन एक्झिट गेटवर पोहोचलो तेव्हा ते विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचं समजलं. 
या घटनेची माहिती मिळताच तिचे मन सुन्न झाले. त्यानंतर ती घरी परतली. भूमी लंडनला जाणार होती. ती तिच्या पतीसोबत लंडनमध्ये राहते आणि सुट्टीसाठी भारतात आली होती. तिचा पती अजूनही ब्रिटनमध्ये आहे. फक्त 10 मिनिटांच्या उशिरामुळे ती प्रवास करू शकली नाही. ट्रॅफिकमुळे तिला विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाला. विमान अपघाताची बातमी ऐकताच ती स्तब्ध झाली. माझ्या गणपती बाप्पाने मला वाचवले अशी भावना तिने व्यक्त केली आहे. विमान चुकल्यानंतर ती दुपारी 1.30 ३० वाजता विमानतळावरून परतली. भूमी दोन वर्षांपूर्वी लंडनला गेली होती. त्यानंतर ती पहिल्यांदाच भारतात आली होती. 

एक प्रवासी वाचला.
विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर विमानाच्या आतील एक प्रवासी वाचला. रमेश विश्वास कुमार असं या वाचलेल्या प्रवाशाचे नाव असून तो 40 वर्षांचा आहे.  अहमदाबादमधील असरवा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अहमदाबादचे पोलिस आयुक्त जीएस मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश सीट क्रमांक 11A वर बसलेला होता.