Advertisement
अहमदाबाद : येथील विमानतळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मेघानी येथे एअर इंडियाचं बोईंग 787 हे विमान पडलं. या विमानामध्ये 242 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दिल्लीहून अहमदाबादमार्गे इंग्लंडला जात असलेलं हे विमान रहिवाशी भागात पडले असून विमानामधून 52 ब्रिटीश नागरिक प्रवास करत होते. अहमदाबाद विमानतळाजवळ लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान एआय 171 च्या दुर्दैवी अपघातानंतर, सीआयएसएफ (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) ने तात्काळ आपत्कालीन प्रोटोकॉल सक्रिय केला. सीआयएसएफने घटनास्थळाचे फोटो ट्विट केले आहेत आणि माहिती दिली आहे.या दुःखाच्या क्षणी पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत उभे आहेत आणि सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे सीआयएसएफने म्हटल आहे.
अधिक माहिती देण्यासाठी 1800 5691 444 हा प्रवासी हॉटलाइन क्रमांक देखील सुरू केला आहे.या घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना एअर इंडिया पूर्ण सहकार्य करत आहे.एअर इंडिया त्यांच्या एक्स हँडल (x.com/airindia) आणि airindia.com वर नियमित अपडेट्सद्वारे पुढील माहिती जाहीर करत आहे.