#

Advertisement

Wednesday, June 4, 2025, June 04, 2025 WIB
Last Updated 2025-06-04T17:34:25Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

विद्यार्थ्यांना आता पहिलीपासूनच सैनिकी शिक्षण

Advertisement


शिक्षण विभागाचा मोठा निर्णय 

नाशिक : राज्यात आता इयत्ता पहिलीपासूनच लष्कराचे बेसिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राष्ट्रभक्तीची भावना लहान वयातच दृढ होण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येत आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राष्ट्र प्रथम ही भावना रुजवण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये एका जाहीर कार्यक्रमात याविषयीची घोषणा केली आहे. माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) स्काऊट गाईड्स हे विद्यार्थ्यांना हे लष्करी प्रशिक्षण देतील. त्यासाठी राज्यातील 2.5 लाख माजी सैनिकांची मदत घेणार असल्याचे भुसे म्हणाले. 
इयत्ता पहिलीपासून मूलभूत सैनिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशावर प्रेम करणे, नियमित स्वरुपात शारीरिक व्यायाम करणे आणि शिस्त लगावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.” अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. तर याविषयीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचेही त्यांनी सांगितले. 
जिल्हा परिषदेच्या 48 शिक्षकांना नुकतेच सिंगापूर या देशाच्या अभ्यास दौऱ्यावर पाठवण्यात आले होते. सिंगापूरमधील शिक्षण व्यवस्थेत राष्ट्र प्रथम ही संकल्पना आढळून आली. त्यामुळे हाच दुवा पकडत राज्यातही राष्ट्र प्रथम ही संकल्पना इयत्ता पहिलीपासूनच राबवण्यात येणार आहे. त्यासाठी इयत्ता पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री भुसे यांनी दिली.