Advertisement
डोंगरावर बसा नाहीतर दरीत फूलस्पीड नेटवर्क
मुंबई : इलॉन मस्क भाऊंच्या स्टारलिंकला भारतात GMPCS लायसन्स मिळाले आहे. त्यामुळे देशात सॅटलाईट आधारे इंटरनेट सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतू कंपनीला लागलीच सेवा लाँच करता येणार नाही. स्टार लिंक भारतात सॅटेलाईट इंटरनेटसाठी सरकारी लायसन्स मिळविणारी तिसरी कंपनी ठरली आहे. भारतात डोंगर, पर्वत दऱ्या खोऱ्यातील अतिदुर्गम भागातही आता थेट उपग्रहाद्वारे फूल स्पीड नेटवर्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या स्टारलिंक सॅटेलाईटचे भाडे भारतीयांना परवडणार का असा सवाल केला जात आहे.
एकीकडे इलॉन मस्क यांनी भारतात दिग्गज जिओ नेटवर्क कंपनी असताना Starlink सॅटेलाईट नेटवर्क मार्केटमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आता केवळ लाँचिंगच्या एक पाऊल दुर आहे. गेल्या महिन्यातच स्टारलिंकला लेटर ऑफ इंटेंट मिळाले होते. आता स्टारलिंकला सरकारने GMPCS परवाना दिला आहे.लायसन्स मिळवल्यानंतर आता स्टारलिंक समोर आता एक आव्हान आणखीन आहे. कंपनीला IN-SPACe कडून अंतिम मंजूरी मिळणे बाकी आहे. ही मंजूरी मिळाली की भारतातील लोक सॅटेलाईटद्वारे इंटरनेट सेवा मिळवू शकणार आहेत. परंतू ही शेवटची पायरी पूर्ण करण्यास नेमका किती वेळ लागणार याचा उलगडा झालेला नाही.
