#

Advertisement

Tuesday, June 10, 2025, June 10, 2025 WIB
Last Updated 2025-06-10T12:55:04Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सुप्रिया सुळेंच्या Whatsapp स्टेटसने उंचावल्या अनेकांच्या भुवया

Advertisement

पुणे : शरद पवार यांच्या खासदार कन्या आणि अजित पवार यांची बहीण सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेचा विषय ठरत आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला सुप्रिया सुळेंनी त्यांच्या खासगी व्हॉट्सअप क्रमांकावरुन ठेवलेलं स्टेटस चर्चेत आहे.
सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या आईने दिलेला एक सल्ला व्हॉट्सअप स्टेटसवरुन शेअर केला आहे. मात्र सुप्रिया सुळेंनी या स्टेटसमध्ये वापरलेल्या भाषेवरुन वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. सुप्रिया सुळे यांनी स्टेटसमुळं चर्चेला उधाण आलं आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांची आई प्रतिभा पवार यांनी दिलेला एक सल्ला आपण रोज स्वत:ला आठवण करुन देत असतो असं म्हटलं आहे. हा सल्ला काय आहे हे सांगितलं आहे. मात्र हे स्टेटस अपलोड केल्यानंतर काही वेळाने त्यांनी स्पष्टीकरण असं म्हणत अन्य एक स्टेटस अपडेट केलं. 

पहिल्या स्टेटसमध्ये काय?
आईला सगळं माहिती असतं. माझ्या पालकांनी मला एक सल्ला दिला होता. माझ्या आईने जे मला सांगितलंय त्याची मी स्वत:ला रोज आठवण करुन देते. 'सहन करायला शिक, असं सुप्रिया सुळेंच्या पहिल्या स्टेटसमध्ये म्हटलं आहे. त्यांनी हे स्टेटस काल सायंकाळी सहा वाजून 26 मिनिटांनी आपल्या खासगी क्रमांकावरुन अपडेट केलं होतं. 

दुसरं स्टेटसही चर्चेत
त्यानंतर त्यांनी अपडेट केलेल्या स्टेटसमध्ये आधीच्या स्टेटससंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. सहन करायला शिक, आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो. आपण प्रयत्न करत राहायचे. त्यावर आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो. आपण काही करु शकत नाही, परिस्थिती आपल्या हातात नसतात... तेव्हा घट्ट व्हायचं आणि सहन करायचं... कर्तव्य करत राहायची. आपले संस्कार कधी विसरायचे नाहीत.., असं दुसऱ्या स्टेटसमध्ये लिहिलेलं होतं.