#

Advertisement

Friday, July 11, 2025, July 11, 2025 WIB
Last Updated 2025-07-11T12:04:56Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

लाडकी बहिण योजनेचे पोर्टल सुरू करा : अॅड. कोमल ढोबळे-साळुंखे

Advertisement

मंगळवेढा : विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पोर्टल गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्यामुळे या योजनेत नव्याने पात्र असणाऱ्या महिला लाभापासून वंचित राहिल्या आहेत. मतदानाचा अधिकार वयाच्या १८ व्या वर्षी संविधानाने महिलेला दिला. मात्र, लाडकी बहीण होण्यासाठीचा अधिकार मात्र २१व्या वर्षी दिला. बहिणीच्या बाबतीत वयावरून दुजाभाव न करता करता १८ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देणे आवश्यक आहे. शिवाय वर्षभरात नव्याने या योजनेसाठी पात्र झालेत्या महिलेचा समावेश देखील लाडक्या बहिणी योजनेत करावा. तांत्रिक कारणास्तव लाभ न मिळालेल्या महिलांनाही लाभ द्यावा, अशी मागणी बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. कोमल ढोबळे-साळुंखे यांनी केली आहे.
जुलै २०२४ पासून महाराष्ट्र शासनाने २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेमध्ये सुरुवातीला दरमहा १५०० रुपये देण्याचे निश्चित  केले. मात्र, जुलै २०२४ नंतर ज्या महिलांना २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या महिला अद्याप या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे या योजनेच्या लाभासाठी नव्याने पात्र ठरलेल्या महिलांचा समावेश होणे गरजेचे आहे. काही महिलांच्या अर्जामध्ये तांत्रिक त्रुटी असल्यामुळे त्यांना या योजनेचे लाभ अद्याप मिळाला नाही. लाभ का मिळाला नाही याची माहिती देखील प्रशासनाकडून दिली जात नाही तसेच दुरुस्तीसाठी योग्य ते मार्गदर्शन केले जात नाही. तांत्रिक त्रुटींची दुरुस्ती करण्यासाठी हे पोर्टल सुरू होणे आवश्यक आहे. शिवाय जुलै २०२४ पासून नव्याने २१ वर्षे पूर्ण केलेल्या महिलांसाठी या योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे, असेही अॅड. कोमल ढोबळे-साळुंखे यांनी म्हटले आहे.