Advertisement
मुंबई : महाराष्ट्रातील एक श्रीमंत आमदार भारतातील बडे उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांना टक्कर देतो. हा श्रीमंत आमदार फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील सर्वात श्रीमंत आमदार आहे. महाराष्ट्रातील हा सर्वात श्रीमंत आमदार 33830000000 रुपयांचा मालक आहे. हा आमदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 27 पट श्रीमंत आहे. विशेष म्हणजे या आमदाराची संपत्ती पाच वर्षात 575 टक्क्यांनी वाढली आहे.
पराग शहा असे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदाराचे नाव आहे. पराग शहा हे मुंबईतील घाटकोपर पूर्व मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. 2024 विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात पराग शहा यांनी सध्याची संपत्ती 3353.06 इतकी असल्याचे नमूद केले आहे. पाच वर्षात पराग शहा यांच्या संपत्तीत 575 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसत आहे. कारण, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञा पत्र सादर करताना त्यांची संपत्ती 550 कोटी असल्याचे नमूद केले होते. अजित पवार यांच्याकडे 124 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच त्यांच्यावर 21.39 कोटी रुपये कर्ज आहे.पराग शाह यांच्याकडे 3,315 कोटींची जंगम आणि 67 कोटींची अचल मालमत्ता आहे. स्वतःच्या नावावर 2,179 कोटी तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 1,136 कोटींची संपत्ती आहे. पराग शाह हे रिअल इस्टेट बिल्डर आहेत आणि मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लिमिटेड ही बांधकाम कंपनी चालवतात. पराग शाह हे शाह हे एमआयसीआय ग्रुपचे अध्यक्ष देखील आहेत.
महाराष्ट्रातील इतर श्रीमंत आमदार
मंगलप्रभात लोढा : मंगलप्रभात लोढा हे मुंबईतील मलबार हिलचे आमदार आहेत. मंगलप्रभात लोढा हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 441 कोटी इतकी आहे.
संजय चंद्रकांत जगताप : संजय चंद्रकांत जगताप हे कॉंग्रेस पक्षाचे पुण्यातील पुरंदर मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 245 कोटी आहे.
विश्वजीत पतंगराव कदम : विश्वजीत पतंगराव कदम हे कॉंग्रेस पक्षाचे आमदार आहेत. पलूस कडेगाव हा त्यांचा मतदारसंघ आहे. त्यांची मालमत्ता 216 कोटी रुपये आहे.
अबू अझीम अस्मी : अबू अझीम अस्मी हे समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. मानखुर्द शिवाजीनगर चे आमदार आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 209 कोटी आहे.