Advertisement
मुंबई : विजयकुमार घाडगे मारहाण प्रकरणी सूरज चव्हाणांनी अजित पवारांच्या निर्देशानंतर राजीनामा दिला आहे. सूरज चव्हाणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांना अटक करावी, अशी मागणी छावा संघटना आणि विरोधकांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मारहाणीच्या घटना थांबता थांबत नाहीत. राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाणांनी छावा संघटनेचे कार्यकर्ते विजय घाटगेंना जबर मारहाण करत जखमी केले. दरम्यान, यानंतर राजकारण पेटल्याने राष्ट्रवादीने सूरज चव्हाणांचा राजीनामा घेतला आहे. लातूरमध्ये सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत कोकाटेंच्या मुद्द्यावरून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरेंना निवेदन दिलं होते. तटकरेंच्या समोर पत्ते देखील फेकले होते. दरम्यान, यानंतर सूरज चव्हाणांनी विजय घाडगेंना रक्त निघेपर्यंत मारहाण केली होती. या मारहाणप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज चव्हाणांनी केलेल्या मारहाणीनंतर अजित पवारांनी देखील निषेध व्यक्त केला. तसेच कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना देखील अजित पवारांनी इशारा दिला आहे.
