Advertisement
आयकर विभागाची नोटीस, स्वत: दिली कबुली
संभाजीनगर : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या वर गेल्या काही दिवसांमध्ये भ्रष्टाचाराबाबत अनेक आरोप झाले आहे. त्यावर संजय शिरसाट यांनी फक्त शांत राहण्याची भूमिका घेतली होती. मात्र संभाजीनगरमधील एका कार्यक्रमातील संजय शिरसाट यांचे एक वक्तव्य मात्र चांगलेच चर्चेत आले आहे.आता यापुढं ब्लॅकचे पैसे चालणार नाही असे विधान त्यांनी केलं आहे. पुढं जाऊन हे विधान फक्त माझ्यासाठी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. संजय शिरसाट यांच्या या विधानानंतर त्या ठिकाणी हशा पिकला. सोबतच मला आयकर विभागाकडून नोटीस आल्याची त्यांनी भर कार्यक्रमात जाहीर कबुली दिली. 2019 मध्ये निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होती आणि 2024 मध्ये तुमची संपत्ती इतकी कशी झाली असे विचरल्याचे संजय शिरसाट यांनी कार्यक्रमात सांगितले. याबाबत मला 9 तारखेला खुलासा करण्याचे सांगितले आहे असं ते म्हणाले.
आयकर विभाग असेल किंवा इतर कोणतेही विभाग असतील ते त्यांचं काम करत आहेत. त्यामध्ये चुकीचं काही नाही. 2019 आणि 2024 मध्ये संपत्तीमध्ये झालेली वाढ याबद्दलचे त्यांनी स्पष्टीकरण मागितलं आहे. त्यामुळे त्यांचं काम ते करत आहेत. जर इतर लोकांना वाटतं की राजकीय लोकांवर आणि पुढाऱ्यावर कारवाई का होत नाही असं नाहीये. त्यांनी पाठवलेल्या नोटीसला मी उत्तर देणार आहे. सरकारकडून माझ्यावर कोणताही दबाव नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
