Advertisement
महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक मानसिक छळ
नाशिक : राज्य भरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशातच नाशिमध्ये एक खळबळनज प्रकार घडला आहे. 30 महिलांचा लैंगिक मानसिक छळ करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेतील विभागीय अधिकाऱ्यानेचे या महिलांच्या छळ केला आहे. या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन टर्म पासून नाशिकमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी या महिला आहेत. असे असताना नाशिक जिल्हा परिषदेमध्ये महिला कर्मचारी असुरक्षित असल्याचा समोर आला आहे. जिल्हा परिषदेतील विभागीय अधिकारी हा महिलांचा लैंगिक मानसिक छळ करत असल्याचे तक्रारी विशाखा समितीकडे प्राप्त झाले आहेत एक दोन नव्हे तर चक्क 30 महिलांनी याबाबत तक्रार केली आहे. अधिकारी प्रदीर्घ काळापासून नाशिक जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहे परिणामी त्याच्यावर कुणीही कारवाई करण्यास धजत नाही असे चित्र आहे. पुराव्यासह आता काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर विशाखा समितीकडे याचा तपास देण्यात आला आहे.
