Advertisement
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी १ जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली जावी, असे आदेश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदारांची संख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वाढेल, असा अंदाज व्यक्त करताना प्राथमिक तयारीबाबत आयोगाची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. समोर आलेल्या माहितीनुसार, एकूण ६७६ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. या सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी आयोगाला सुमारे साडेसहा लाख EVM मशीनची आवश्यकता आहे. तर आपुऱ्या EVM संख्येमुळे आयोगासमोर एकाच टप्प्यात मतदान घेणं मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे यंदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तीन टप्प्यात होण्याची शक्यता आहे.
