Advertisement
बीड : धनंजय मुंडे हे अज्ञातवासातून बाहेर पडले असून याच प्रकरणासंदर्भात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी मुंडे हे डोळ्यावर गॉगल लावूनच संवाद साधत होते. गेल्या काही दिवसांत धनंजय मुंडे हे सतत गॉगल लावूनच फिरताना दिसत आहेत. यामागचे कारण असे आहे की....
धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सीने ग्रासले होते. यातून ते बऱ्यापैकी सावरले आहे. सुरूवातीला त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याचे बोलले जात होते, मात्र स्वता धनंजय मुंडे यांनी आपल्याला अर्धांगवायूचा झटका आलेला नसून आपल्याला बेल्स पाल्सीने ग्रासल्याचे सांगितले होते. धनंजय मुंडे यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना बेल्स पाल्सीचा त्रास व्हायला लागला. त्याच काळात धनंजय मुंडे यांच्यावर चहूबाजूने टीका होऊ लागली होती. बेल्स पाल्सीमुळे धनंजय मुंडे यांना नीट बोलता येत नव्हते आणि त्याचा त्रास त्यांना आजही काही प्रमाणात होताना दिसतो आहे. बेल्स पाल्सी झालेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याच्या काही भागावर नीटपणे नियंत्रण राहात नाही. यामुळे त्यांचा एक डोळा बोलताना बंद होतो, ते वाईट दिसत असल्याने धनंजय मुंडे यांनी गॉगल लावण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना ते कटाक्षाने गॉगल वापरताना दिसत आहेत.
