Advertisement
अहिल्यानगर- पुणे महामार्गावर भीषण अपघात
अहिल्यानगर : अहिल्यानगर- पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भाजप सुरेश धस यांच्या मुलाच्या कारच्या धडकेत बाईक स्वाराच्या मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे. अपघात नेमका कसा झाला याचा पोलिस तपास करत आहेत. या अपघातात कारची अवस्था खूपच भयानक झाली आहे.
नितीन शेळके असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. आष्टी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस याच्या चारचाकी वाहनाने या दुचाकीस्वाराला धडक दिली. काल रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान अहिल्यानगर- पुणे महामार्गावर हा अपघात घडला आहे. या प्रकरणी सुपा पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. दुचाकीस्वार हा जातेगाव फाट्याकडून रास्ता ओलांडत असतांना सागर धस याच्या वाहनाने जोराची धडक यात या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
