Advertisement
नाशिक : पालकमंत्री वादात मंत्री छगन भुजबळ यांची एन्ट्री झाली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मंत्री छगन भुजबळ ध्वजारोहण करण्यासाठी गोंदियाला जाणार नाहीत. तर आता भुजबळांएैवजी मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते गोंदियात ध्वजारोहण होणार आहे.
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 7 आमदार असतानाही नाशिक सोडून गोंदियाला का जायचं? अशी भूमिका भुजबळांनी घेतल्याची चर्चा आहे .त्यामुळे आता नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या वादात भाजप, शिवसेनेबरोबरच आता राष्ट्रवादीचाही दावा असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे दोघात तिसऱ्याच्या एन्ट्रीनं जुना वाद संपून नव्या वादाला तोंड फुटणार असल्याची चर्चा आहे.
भुजबळांच्या एन्ट्रीमुळे आता शिवसेना भाजपसोबत राष्ट्रवादीही पालकमंत्रीपदासाठी इच्छूक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 79व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात नाशिकच्या झेंडावंदनाची जबाबदारी गिरीष महाजनांकडे देण्यात आली. तर, गोंदिया जिल्ह्यातील झेंडावंदनासाठी छगन भुजबळ यांचं नाव होतं. मात्र] नाशिक सोडून गोंदियाला झेंडावंदनासाठी भुजबळ जाणार नाहीत.