#

Advertisement

Tuesday, September 9, 2025, September 09, 2025 WIB
Last Updated 2025-09-09T13:47:06Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महापालिका निवडणुकांच्या हालचालींना वेग

Advertisement

मुंबई : राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडून आज मुंबई महापालिकेच्या निवडणूकपूर्व तयारीच्या कामांचा आढावा घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये त्यांनी निवडणूकपूर्व कामाचा आढावा घेतला. सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केलेली पूर्वतयारी परिपूर्ण असल्याचे नमूद करण्यात आलं आहे.
राज्य निवडणूक आयुक्तांनी म्हटलं की, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने निवडणुकीसाठी केलेली पूर्वतयारी परिपूर्ण आहे. मतदान केंद्रांवरील सुविधा वाढवून त्याची प्रभावी जनजागृती करण्यात यावी, जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढेल. मागील सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकीदरम्यान आलेल्या अडचणींचे निराकरण कशा प्रकारे होईल, याचा विचार करून यंदा अधिक सक्षम उपाययोजना राबवाव्यात. मतदान प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पार पाडावी, यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावीत. सर्वांनी पारदर्शक व निर्भयपणे कामकाज करावे. विविध यंत्रणांमध्ये योग्य समन्वय साधून कामकाज सुरळीत व प्रभावीरितीने पूर्ण होईल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश यावेळी राज्य निवडणूक आयुक्त  वाघमारे यांनी दिले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळत आहे.