#

Advertisement

Friday, January 23, 2026, January 23, 2026 WIB
Last Updated 2026-01-23T15:38:16Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

लक्ष्मी दहिवडी गट मी माझ्या घराप्रमाणे सांभाळणार !

Advertisement

अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे : सगळी माझ्या जीवाभावाची माणसं 

मंगळवेढा : जिल्हा परिषदेच्या 2017च्या निवडणुकीत केवळ आईला पराभूत करायचे, असा उद्देश ठेऊनच विरोधकांनी येथील ग्रमस्थांवर, समाजावर निवडणूक लादली. माझे वडील लक्ष्मणराव ढोबळे आणि आई स्व. अनुराधा यांच्या संघर्षमय जीवनातून आत्तापर्यंत पेरलेल्या सकारात्मक संस्काराचा उपयोग मला नेहमीच झाला, हेच माझ्या आजपर्यंतच्या यशाचे प्रमुख कारण आहे, आपला लक्ष्मी दहिवडी गटही मी माझ्या घराप्रमाणे सांभाळणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक रिंगणात असलेल्या अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी लक्षवेधीशी बोलताना सांगितले.
मी जसे घर नीटनेटके सांभाळते, तसाच माझा लक्ष्मी दहिवडी गट स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटका करणार असल्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी देत माझ्यावर विश्वास दाखविला आहे, येथील ग्रामस्थांही विश्वास दाखवतील, असा सांगत अ‍ॅड. कोमलताई म्हणाल्या की, माझ्या वडिलांनी मोठ्या कष्टातून शिक्षण घेतले, समाजाच्या वेदना त्यांनी नेहमी जाणल्या, समाजातील मुले शिक्षणपासून वंचीत राहू नये याकरिता त्यांनी मोठे प्रयत्न केले. मोठ्या कष्टातून शाळा, शिष्यवृत्ती सुरू केली. समाजासाठी झटताना अनेक अडचणी त्यांना आल्या, त्यांची राजकीय कारकिर्दही चढउताराची राहिली, ज्यांना मोठे केले अशा लोकांनी पाय ओढले परंतु, ते डगमगले नाहीत, वडीलांनी जे सकारात्मक पेरले, त्यातूनच अनेक चांगली, जिवाभावाची माणसं भेटत गेली अनेक कुटुंबाचे आमच्यावर विशेष प्रेम आहे. कितीतरी वडीलधारी, बायाबापड्या मला भेटल्यावर आवर्जून चौकशी करतात. निवडणुकीला मी उभे राहायला तयार नव्हते परंतु, अनेकांनी मोठा आग्रह केला. गावाला चांगल्या नेतृत्वाची गरज असल्याचे आणि ताई तुम्ही नक्की निवडून येणार, आम्ही निवडून आणू, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आणि कार्यकर्त्यांनीच माझी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मी आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे जात आहे, समोर कोण आहे? यापेक्षा माझी माणसं माझ्या बरोबर आहेत, ते मला साथ देतील हेच मी पाहत आहे. त्यामुळे निवडुन आल्यानंतरही या लोकांचा विश्वास जपत अनेक कामे करण्याचा संकल्पही अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी बोलून दाखविला.