#

Advertisement

Monday, May 25, 2026, May 25, 2026 WIB
Last Updated 2026-05-25T13:52:08Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अधिक मासात पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी प्रचंड गर्दी

Advertisement

चार ते पाच किलोमिटरपर्यंत लागल्या रांगा 

पंढरपूर : अधिक मासात पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली आहे. विठ्ठल मंदिरापासून जवळपास चार ते पाच किलोमिटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. मे महिन्यातील रविवार आणि अधिक मासानिमित्त पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. सध्या विठ्ठलाची दर्शन रांग गोपाळपूर रोडपर्यंत जाऊन पोहोचली आहे. अधिक मासात विठ्ठल दर्शन घेणं हे भाविकांसाठी एक पर्वणी समजली जाते. 
गोपाळपूर रोडचे सर्व पत्रा शेड हे विठ्ठल भक्तांनी फुलून गेले आहेत. दर्शनासाठी किमान आठ ते दहा तासांचा कालावधी लागतो आहे. अशातच उन्हाचा पारा वाढत असताना भाविकांसाठी कुलर देखील दर्शन रांगेत लावण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या विठ्ठलभक्त वारकऱ्यांना दर्शन रांगेत थंड पाणी व कुलरच्या थंडाव्यामुळे विठ्ठलाच्या भक्तीचा मार्ग सुखकर होत आहे. पुरुषोत्तम अधिक मासामुळे भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरमध्ये आले आहेत. गोपाळपूरच्या पाच नंबरच्या पत्रा शेड त्यामुळे मोठी गर्दी दिसत होती. इथं पासून चार ते पाच किमी अंतरावर विठ्ठलाचं दर्शन मिळणार होतं. दर्शन रांगेत भाविकांचा उत्साह ही दिसत होता. राज्यभरातून भाविक दर्शनासाठी आले आहेत. काही भाविक सकाळी साडेसात वाजल्यापासून दर्शनासाठी उभे होते. पंढरपूरमध्ये सध्या पार 43 अंशापार गेला आहे. असं असताना ही  उन्हाचा काही त्रास होत नाही असं भाविकांनी सांगितलं.भाविकांचा उन्हापासून बचाव व्हावा यासाठी मंदिर समितीने कुलरची सोय केली होती.