#

Advertisement

Friday, July 31, 2026, July 31, 2026 WIB
Last Updated 2026-07-31T12:13:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पालिकेला टाळे ठोको आंदोलनाचा आमदार पवार यांचा इशारा !

Advertisement

मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरण ; ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांची माहिती 

पिंपरी : मोशी येथे कचरा डेपोमध्ये झालेल्या दुर्घटनेला वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासाठी नेमलेली कंपनी आणि महापालिकेचे अधिकारी कारणीभूत आहे. या अधिकार्‍यांचे निलंबन करून चालणार नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. अँटोनी वेस्ट या कंपनीच्या संचालकांवर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे, यासंदर्भात योग्य ती कार्यवाही झाली नाही तर राष्ट्रवादी (श.प.) काँग्रेसतर्फे  पिंपरी-चिंचवड शहरात मोठे जनआंदोलन उभारून महापालिकेला टाळे लावण्याचा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी माहिती राष्ट्रवादी (श.प.) कांग्रेसच्या महिला उप प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे माहिती यांनी दिली.
आमदार रोहित पवार यांनी महापालिकेत गुरूवारी (दि. 30) बैठक घेतली. या बैठकीला आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे हजर नव्हते. तर अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या उपस्थितीतही बैठक झाली. याबाबत ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी माहिती देताना सांगितले की, आमदार रोहित पवार यांनी या घटनेला जबाबदार असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. येत्या दहा ते बारा दिवसांत याबाबत काही कार्यवाही झाली नाही तर शहरात मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, मोशी कचरा डेपोच्या दुर्घटनेतील जखमी कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांची भेट आमदार रोहित पवार यांनी घेतली आहे. त्यांनी अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. महापालिकेने वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारला, त्यामध्ये अनेक नियम पायदळी तुडवले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस देऊन देखील महापालिकेने दुर्लक्ष केले. प्रकल्पाची क्षमता ७०० टन असताना त्याठिकाणी १२०० टन कचरा टाकला जात होता. कचर्‍यावर प्रक्रिया करण्याच्या नावाखाली ठेकेदाराने खिसे भरले. त्याला अधिकार्‍यांनी देखील साथ दिली, असा थेट आरोप आमदार  पवार यांनी केला आहे. मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना निलंबित करण्यात आले असले तरी ही कारवाई होऊ शकत नाही. या घटनेला जबाबदार असलेल्या प्रत्येकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी आमदार पवार यांच्यासह आम्ही लावून धरली आहे, संबंधित अधिकारी आणि कंपनीच्या संचालकांवरही गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे.