#

Advertisement

Friday, July 31, 2026, July 31, 2026 WIB
Last Updated 2026-07-31T15:13:48Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

गुरुपौर्णिमेला विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेविकेची पाद्यपूजा

Advertisement

पुण्यात राजकीय वाद पेटला

 पुणे : शहरातील सुखसागर नगर भागातील एका महापालिका शाळेत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एक वादग्रस्त प्रकार समोर आला आहे. शाळेतील लहान मुलांकडून भाजपच्या महिला नगरसेविका वर्षा साठे यांचे पाय धुवून पाद्यपूजा करून घेण्यात आली. या प्रसंगाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित झाल्यानंतर नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शाळेत आयोजित विशेष कार्यक्रमासाठी साठे यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांचे चरणप्रक्षालन केल्याचे उघडकीस आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
या संपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष अमोल परदेशी यांनी अतिशय कडक शब्दांत विरोध दर्शवला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, शाळा हे ज्ञान, समता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणारे ठिकाण आहे.ते कोणत्याही व्यक्तीच्या पूजेचे स्थान बनता कामा नये.
शाळकरी बालकांकडून लोकप्रतिनिधीचे चरण धुवून घेणे हे संविधानात्मक मूल्यांना हरताळ फासणारे असून संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेला कलंक लावणारे आहे, असा आरोपही परदेशी यांनी केला. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून जबाबदार घटकांवर कठोर कारवाई करावी. तसेच, भविष्यात अशा घटनांचे पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिक्षण मंडळाने तातडीने नियम तयार करावेत, अशी मागणी पुढे आली आहे.