Advertisement
मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा साखरपुडा आज पुण्यात झाला. संध्याकाळी साडे सहा वाजता साखरपुड्याचा मुहूर्त नियोजित होता. या साखरपुडा सोहळ्यासाठी खास पण मोजक्या पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते.
पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा यांचा हा साखरपुडा सोहळा येरवडा येथील हॉटेल द रिट्स कार्लटोन येथे झाला. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व 40 आमदार उपस्थित होते. याशिवाय पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांच्यासह विविध पक्षातील 15 खासदारही या सोहळ्याला उपस्थित होते. यामध्ये भाजप खासदार निशिकांत दुबे, सुधा मूर्ती, सी एम रमेश, मख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, द्योजक मोहित कंबोज यांचा निमंत्रितांमध्ये समावेश आहे. तसेच या साखरपुड्याला काही विशेष पाहुण्यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे.
कायनात दारा यांचे पवार कुटुंबाशी कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे बोलले जाते. यापूर्वीही कायनात दारा पार्थ पवार यांच्यासोबत काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पार्थ पवार आणि कायनात दारा यांनी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात एकत्र दर्शन घेतले होते, ज्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पवार कुटुंबातील रेवती सुळे आणि उद्योजक सारंग लखानी यांचा विवाह मुंबईत अत्यंत थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात कायनात दारा यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत प्रवेश केला. हे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर, राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली होती.
बारामती येथे २७ फेब्रुवारी २०२७ ला होणार विवाह
खासदार पार्थ अजित पवार यांचा विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे होणार आहे. त्यापूर्वी आज (बुधवारी, ता. २९) साध्या आणि कौटुंबिक वातावरणात, मोजक्या नातेवाईकांच्या व फक्त निमंत्रित यांच्या उपस्थितीत साखरपुडा समारंभ पार पडला. पार्थ पवार यांच्या होणाऱ्या पत्नी कायनात दारा या मूळच्या चंदीगड येथील आहेत, व सध्या दिल्ली येथे वास्तव्यास आहेत.
