#

Advertisement

Monday, August 3, 2026, August 03, 2026 WIB
Last Updated 2026-08-03T13:26:11Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपावा !

Advertisement

साठे नगर येथे जयंतीनिमित्त ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे मार्गदर्शन

मंगळवेढा : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साठे नगर, मंगळवेढा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्याचा मान ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांना मिळाला.
पूजनानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना ॲड. साळुंखे-ढोबळे यांनी अण्णा भाऊ साठे यांचे सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्य अधोरेखित केले. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि बचत गटांची चळवळ अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी स्वावलंबी बनून सामाजिक आणि आर्थिक विकासात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा सौ. सुनंदा आवताडे, माजी प्राचार्या सौ. तेजस्विनी कदम, नगरसेविका कु. विद्यागौरी अवघडे, माजी नगरसेविका श्रीमती कलावती खंदारे, नगरसेवक सोमनाथ माळी, गणेश धोत्रे, ॲड. दुधाळ, ॲड. राहुल घुले, खंडू खंदारे, प्रकाश खंदारे, मल्हारी कांबळे, प्रा. सिद्धेश्वर अवघडे, पत्रकार ज्ञानेश्वर भगरे, पत्रकार कैलास रणदिवे, उत्सव समितीचे अध्यक्ष जनार्दन अवघडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करण्यात आला तसेच सामाजिक ऐक्य, शिक्षणाचा प्रसार आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.