Advertisement
- आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
- शैक्षणिक साहित्य, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा,
- लोकशाहीर यांच्या गीतांसह, शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
मंगरुळ : लोकशाहीर, कवी, कथा, कादंबरीकार व बहुजन समाजाचे प्रेरणास्थान साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांची १०६ वी जयंती शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचलित संत गाडगे बाबा आश्रम शाळा मंगरुळ तालुका तुळजापुर सामाजिक व शैक्षणिक उपक्रम घेऊन उत्साहात साजरी करण्यात आली.
शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचलित संत गाडगे बाबा आश्रम मौजे मंगरुळ येथे आण्णा भाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व गोरगरीब माता, भगिनींना साडी व शालेय साहित्य खाऊ वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक ईश्वर क्षीरसागर व यांनी आण्णा भाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सावंत अशोक यांनी लोकमान्य टिळक यांच्या. प्रतिभेची पूजन केले. यावेळी प्रास्ताविक अनिल गायकवाड मु.अ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वैद्य एम.आर. यांनी केले.
मौजे मंगरुळ येथे आण्णा भाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व गोरगरीब माता भगिनींना साडी व शालेय साहित्य खाऊ वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक ईश्वर क्षीरसागर सर व यांनी आण्णा भाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सावंत अशोक सर यांनी लोकमान्य टिळक यांच्या. प्रतिभेची पूजन केले. यावेळी प्रास्ताविक अनिल गायकवाड मु.अ यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वैद्य यांनी केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक ईश्वर क्षीरसागर म्हणाले की, आण्णा भाऊंनी आपल्या शाहिरी आणि साहित्यातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. कष्टकरी, वंचित बहुजन आणि भटके-विमुक्त समाजाला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यांचे विचार आजही तितकेच मार्गदर्शक आहेत. या कार्यक्रमास बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माता भगिनी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता आण्णा भाऊंच्या गीतांनी करण्यात आली.
