#

Advertisement

Monday, August 31, 2026, August 31, 2026 WIB
Last Updated 2026-08-31T15:16:22Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

चार पिढ्यानंतर मुलीचा जन्म !

Advertisement

आनंदानं आजोबांच्या डोळ्यात पाणी ; रथातून मिरवणूक 

बीड : परळीतील दहिफळे कुटुंबात तब्बल चार पिढ्यांनंतर मुलीचा जन्म झाला आहे. या आनंदात कुटुंबीयांनी नवजात मुलीचे जल्लोषात स्वागत केले आहे. ढोल-ताशांच्या गजरात रथातून मिरवणूक काढत उत्साहात स्वागत केले. गेल्या चार पिढ्यांपासून दहिफळे कुटुंबात मुलीचा जन्म झालेला नव्हता. आता पाचव्या पिढीत मुलीचा जन्म झाल्याने कुटुंबीयांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. हे सांगताना आजोबांच्या डोळ्या पाणी आल्याचं पाहायला मिळालं. 
चार पिढ्यांनंतर कुटुंबात मुलीचा जन्म झाला आहे. त्यामुळं कुटुंबियांना आनंदात रथातून मिरवणूक काढून लेकीचे जल्लोषात स्वागत केले. चार पिढ्यानंतर नात झाली हे सांगताना आजोबा भावूक झाले आहेत. 200 वर्षानंतर घरात मुलीचा जन्म झाला आम्ही तिला फुलासारखं जपणार असल्याच्या भावाना मुलीच्या आजोबांनी व्यक्त केल्या. मुलगी असली तर घराला शोभा असते याची आम्हाला खंत वाटत होती. आता मुलगी झाली आम्ही आनंदी आहोत असे सांगताना आजोबा भावुक झाले.
सध्या ती तिच्या आजीकडे गेली असून मी घरी आल्यावर तिचा लाड करणार असल्याचं काकूने सांगितलं. चार पिढ्यानंतर मुलगी झाल्याने मुलीचे महत्त्व काय आहे हे आम्हाला समजले. आम्ही मुलीला फुलासारखं जपणार आहोत. साधारण दोनशे वर्षानंतर आमच्या घरात मुलीचा जन्म झालाय. मला सर्वजण म्हणतात मुलगा व्हायला पाहिजे पण मुलगी झाल्याचा आनंद वेगळा आहे. मुलीचे प्रेम वडिलांवर जास्त त्यामुळे मला मुलीची अपेक्षा असल्याचे तिचे वडील म्हणाले.