#

Advertisement

Monday, August 3, 2026, August 03, 2026 WIB
Last Updated 2026-08-03T13:49:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

Advertisement

मंगळवेढा : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढा शहरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. शहरातील साठे नगर परिसरात आयोजित जयंती उत्सवात माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी उपस्थित राहून डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी समाजबांधव, युवक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घोषणाबाजी करीत जयंतीचा उत्सव साजरा केला. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे कार्यक्रमस्थळी पोहोचताच कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. हलगी, ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अमर रहे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी बोलताना लक्ष्मण ढोबळे यांनी लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, समाजप्रबोधन आणि सामाजिक समतेसाठीचे योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असून, युवकांनी अण्णा भाऊंचे साहित्य वाचून सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने समाजबांधव, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. जयंतीनिमित्त परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. पुष्पवृष्टी, घोषणाबाजी आणि उत्साही वातावरणामुळे संपूर्ण साठे नगर परिसर उत्सवमय झाला होता.