#

Advertisement

Monday, October 26, 2026, October 26, 2026 WIB
Last Updated 2026-10-26T17:51:25Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

समृद्धी महामार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक

Advertisement

बोगद्यांच्या प्रवेशद्वाराजवळ, डोंगर उतारांवर संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम

पुणे : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून २६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत टप्प्याटप्प्याने १२ दिवसांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंजदरम्यान बोगद्यांच्या प्रवेशद्वाराजवळ आणि डोंगर उतारांवर संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे.
नागपूर-मुंबईदरम्यान सुमारे ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गावर भरवीर आणि इगतपुरी इंटरचेंजदरम्यान काही ठिकाणी डोंगर उतारावरून दरड किंवा दगड कोसळण्याची शक्यता असते. पावसाळ्यात तसेच इतर प्रतिकूल परिस्थितीत वाहनचालकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून संबंधित भागात संरक्षक जाळ्या बसवण्यात येत आहेत. या कामासाठी वाहतूक काही काळ थांबवून टप्प्याटप्प्याने ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

वाहतूक कोणत्या वेळेत बंद राहणार?
इगतपुरी इंटरचेंज ते भरवीर इंटरचेंजदरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकांवर हा ब्लॉक लागू राहणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत दररोज ठरवून दिलेल्या वेळेत वाहतूक बंद ठेवण्यात येईल. सकाळी १० ते ११, दुपारी १ ते २, दुपारी ४ ते ५ या वेळेत मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी ब्लॉकच्या वेळा लक्षात घ्याव्यात आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.