Advertisement
मंगळवेढाच्या इनर व्हील क्लब वतीने आयोजन; प्रवेश शुल्क १०० रुपये, पूर्वनोंदणी आवश्यक
मंगळवेढा, दि. ९ (प्रतिनिधी) : नवरात्रीच्या उत्साहाला रंग, ताल आणि नृत्याची जोड देण्यासाठी इनर व्हील क्लब, मंगळवेढा यांच्या वतीने शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘दांडिया अँड गरबा नाईट’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून नागरिकांना दांडिया आणि गरब्याच्या तालावर आनंद लुटण्याची संधी मिळणार असून, शहरात उत्सवी वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
या कार्यक्रमासाठी प्रवेश शुल्क केवळ १०० रुपये ठेवण्यात आले आहे. मात्र, प्रवेश मर्यादित असल्याने इच्छुकांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर भरलेले प्रवेश शुल्क परत मिळणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
कार्यक्रमादरम्यान सर्व सहभागींसाठी ड्रेस कोडचे पालन करणे अनिवार्य आहे. तसेच आयोजकांच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. स्पर्धेसाठी एन्ट्री पास किंवा कूपन असणे बंधनकारक असून, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. कार्यक्रमासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार इनर व्हील क्लब, मंगळवेढा यांच्याकडे राखीव ठेवण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सौ. अंजली आवताडे, सौ. कोमल ढोबळे-सावली फाउंडेशन, सौ. पल्लवी गायखवाड, सौ. सीमा बुरुजे, सौ. मोना रलपरखी आणि डॉ. सौ. प्रीती शिंदे यांचे सहकार्य लाभत आहे. कार्यक्रमासाठी नोंदणी व अधिक माहितीसाठी दिपाली चिखले (९५७९२३११६३) आणि हेमलता नकाते (९५१८७४६१६७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. ‘चला… गरब्याच्या तालावर थिरकूया!’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मंगळवेढ्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन इनर व्हील क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा तपशील
दिनांक: शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६
वेळ: सायंकाळी ५ वाजता
ठिकाण: श्रीराम हॉल, मंगळवेढा
प्रवेश शुल्क: १०० रुपये
नोंदणी: पूर्वनोंदणी आवश्यक; प्रवेश मर्यादित
