#

Advertisement

Thursday, October 29, 2026, October 29, 2026 WIB
Last Updated 2026-10-29T12:01:46Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

हर्षदा देशमुख यांच्या विजयाचा मंगळवेढ्यात जल्लोष

Advertisement

 

 प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांच्याकडून पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक

ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या प्रचार यंत्रणेचाही महत्त्वाचा वाटा

मंगळवेढा : पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांच्या विजयाबद्दल मंगळवेढा शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दामाजी चौक तसेच पक्ष कार्यालयासमोर जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत विजयाचा उत्सव साजरा केला.
या वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांनी या विजयाचे श्रेय पक्षासाठी सातत्याने मेहनत घेणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले. निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या पातळीवर केलेले प्रयत्न, मतदारांशी साधलेला संपर्क आणि प्रचारासाठी घेतलेली मेहनत यांचा एकत्रित परिणाम या विजयातून दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या निवडणूक प्रक्रियेत आमदार रोहित पवार यांचे सहकार्य लाभले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार यंत्रणा राबविली. महिला कार्यकर्त्यांचा सहभाग, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी केलेले प्रयत्न आणि संघटितपणे केलेले काम यामुळे पक्षाच्या प्रचाराला बळ मिळाल्याचे प्रा. डॉ. ढोबळे यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातून हर्षदा देशमुख यांना अधिकाधिक मते मिळवून देण्यासाठी पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. मतदारांशी संपर्क साधणे, पक्षाची भूमिका मांडणे आणि उमेदवाराच्या प्रचारासाठी संघटनात्मक पातळीवर काम करणे, या माध्यमातून स्थानिक कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. जिल्ह्यातून उमेदवाराला पाठिंबा मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे समाधान असल्याचे प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केले.
या विजयाच्या निमित्ताने मंगळवेढ्यातील पक्ष संघटनेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. निवडणुकीतील यश हे केवळ एका व्यक्तीचे नसून सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगत त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. यापुढेही पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मंगळवेढा शहर व तालुक्यातील पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवक कार्यकर्ते आणि पक्षाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषणाबाजी व आनंदोत्सवाच्या वातावरणात हर्षदा देशमुख यांच्या विजयाचे स्वागत करण्यात आले.