Advertisement
मंगळवेढा : खूपसंगी (ता.मंगळवेढा) येथे जनावराला पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून देण्यास प्रशासनाने विलंब केल्यामुळे संतप्त झालेले माजी मंत्री प्रा.डाॅ लक्ष्मण ढोबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेत थेट प्रांत कार्यालय गाठले प्रांत कार्यालयात टँकर सुरू करण्यावर टाहो फोडताच आज टँकर सुरू करण्यात आला ग्रामस्थांनी याबाबत प्रशासनासह माजी मंत्री ढोबळे यांना धन्यवाद दिले
जनावराला पाणी उपलब्ध करून देण्याबाबत साहेब एक वेळ माणसाला त्रास द्या पण मुक्या जित्राबाचा तळतळाट घेऊ नका. जर घेतला तर तो फार वाईट असतो अशा सुचना वजा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.लक्ष्मण ढोबळे यांनी प्रांत अधिकारी यांना दिला होता.सध्या तालुक्यातील 37 गावात 55 खेपाद्वारे पाणी दिले जात आहे मात्र तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पशुधन असताना या पाण्यामध्ये पशुधनाला पिण्यासाठी पाणी दिले जात नाही त्यामुळे पशुपालकांची चारा व पाण्यासाठी यावरून संतप्त झालेल्या खुपसंगी येथील ग्रामस्थांनी जनावरे थेट ग्रामपंचायतच्या कार्यालयासमोर बांधली होती. शिवाय या गावातील नागरिकांनी चारा छावणी किंवा चारा डेपो सुरू करण्याबाबत देखील निवेदन दिले आहे परंतु त्यानंतर प्रशासनाने कसली हालचाल केली नाही. जिल्ह्यात चाराबंदी केली असली तरी प्रत्यक्षात तालुक्यात कर्नाटकातील चारा येत आहे अशा परिस्थितीत आ. रोहित पवार यांनी काल पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मंगळवेढ्यातील कार्यकर्त्याची संवाद साधत असताना या भागातील कार्यकर्त्यांनी आ.रोहित पवार यांना तालुक्यातील भीषण परिस्थिती वास्तव सांगितले तर त्यांनी मंगळवेढ्यातील कार्यक्रम संपल्यानंतर थेट जिल्हाधिकारी यांच्याशी भेट घेतली व याबाबतच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यानंतर त्यावर जिल्हाधिकारी यांना प्रांताधिकारी यांना भेटणे बाबत देखील सांगितल्यानंतर खुपसंगी ग्रामस्थासह माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी थेट प्रांत कार्यालय गाठले. यावेळी त्यांनी प्रांत अधिकारी यांना हवं तर माणसाचा श्राप घ्या मुक्या जित्राबाचा श्राप घेऊ नका तो फार वाईट असतो. असे सांगत असताना यावेळी संभाजी भोसले जैनदिन पटेल दादा लवटे कल्याण टकले सतीश भोसले बापू क्षीरसागर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते यावर प्रांत अधिकारी यांनी माझ्याकडे आलेले प्रस्ताव मी तात्काळ मार्गी लावत असल्याचे सांगितले सध्या माझ्याकडे काहीही प्रस्ताव प्रलंबित नसलेले सांगितले त्यानंतर हा ढोबळेनी आपला मोर्चा पाणीपुरवठा कार्यालयाकडे वळविला मात्र यापूर्वी तो प्रस्ताव प्रांत ऑफिस कडे दिल्याचे त्यांनी सांगितले होते मात्र प्रत्यक्षात तो प्रस्ताव पाणीपुरवठा ऑफिसमध्येच आढळल्याचे बोलले जात आहे त्यावेळी यामध्ये असलेले त्रुटीची पुर्तता करून प्रस्ताव पुढे ढकलण्याचे सांगितले असले तरी खाजगीत मात्र अद्याप जनावरांसाठी पाणी उपलब्ध करण्याबाबतच्या सूचना नसल्याचे सांगितले. एकूणच शासकीय कार्यालयातील चालढकलीमुळे खुपसंगीकराचे हाल मात्र या निमित्ताने समोर आले. याबाबतचे वृत्त मंगुड शिवार प्रसिद्ध केले होते
