#

Advertisement

Thursday, October 1, 2026, October 01, 2026 WIB
Last Updated 2026-10-01T14:54:32Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश आणि लगेच उमेदवारी !

Advertisement

हर्षवर्धन ऊर्फ भैय्यासाहेब देशमुख यांची मुलगी आदिती पोहरेंना उमेदवारी 

मुंबई : राज्यात शिक्षक आणि पदवीध मतदारसंघासाठी निवडणूक असून काँग्रेसने आपला पहिला उमेदवारही देखील जाहीर केला आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अदिती पोहरेंना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री हर्षवर्धन ऊर्फ भैय्यासाहेब देशमुख यांची मुलगी तथा देशोन्नती वृत्तपत्राचे संपादक प्रकाश पोहरे यांची सून असलेल्या आदिती पोहरेंना उमेदवारी मिळणार असल्याची घोषणाच यशोमती ठाकूर यांनी केली. मुंबइतील  टिळक भवन येथे काँग्रेसचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत अदिती ऋषिकेश पोहरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी, अदिती पोहरेंचे पक्षात स्वागत करत यशोमती ठाकूर यांनी उमेदवारीची घोषणाच केली.
अदिती या अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक म्हणून परिचीत असून अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. या मतदारसंघात अमरावती, अकोला. बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. आदिती यांचे बी.ई. (सिव्हिल इंजिनिअरिंग), एम.ई. (स्ट्रक्चरल डिझाईन), एम.ए. (मानसशास्त्र) असे शिक्षण झाले असून  शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापनाचा दीर्घ अनुभव आहे. 


राजकीय पार्श्वभूमी :

विदर्भातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री हर्षवर्धन ऊर्फ भैय्यासाहेब देशमुख यांच्या कन्या. हर्षवर्धन देशमुख सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार. प्रा. आदिती पोहरे यांचे सासरे प्रकाश पोहरे अकोल्यातून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक देशोन्नती'चे मालक आणि संस्थापक संपादक.
प्रकाश पोहरे यांची संपूर्ण राज्यात शेतकरी नेते अशीही ओळख. राष्ट्रीय किसान ब्रिगेड या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. पोहरे कुटुंबीयांचे अकोल्याच्या राजकारणात दबधशदबा असलेल्या संजय धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकरांशी जवळचे नातेसंबंध. आदिती पोहरे यांच्या सासुबाई साधना पोहरे या अकोल्याचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांची सख्खी बहिण. त्यामुळे आदिती पोहरे या खासदार अनुप धोत्रे यांच्या सख्या आतेभावाची पत्नी.  यासोबतच विधानसभेतील भाजपचे मुख्य प्रतोद आमदार रणधीर सावरकर हे आदिती पोहरे यांचे पती ऋषिकेश पोहरे यांचे सख्खे मावस भाऊ.