Advertisement
१६ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
पुणे : महाराष्ट्र पोलीस दलात राज्य सरकारने मोठे प्रशासकीय फेरबदल केले आहेत. भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) आणि राज्य पोलीस सेवेतील १९ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, नवीन पदस्थापना आणि मुदतवाढीचे आदेश गृह विभागाने जारी केले आहेत. २ नोव्हेंबर रोजी पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक एकच्या शिफारशीनुसार हे आदेश काढण्यात आले आहेत.
या फेरबदलांत ठाणे, पुणे, सातारा, नांदेड, नागपूर, रत्नागिरी, लातूर, बीड, नाशिक, भंडारा आणि मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ठाणे पोलीस दलातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या विद्यमान पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आल्याने या निर्णयाकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. ठाणे शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम आणि कोकण परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांना त्यांच्या सध्याच्या पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रशासकीय फेरबदलांमुळे राज्यातील विविध पोलीस विभागांच्या कामकाजात बदल होणार असून, संबंधित अधिकाऱ्यांना नव्या पदस्थापनांच्या ठिकाणी कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- – अनमोल मित्तल – अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण यांची अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई, बीड येथे नियुक्ती.
- – आकांक्षा यादव – उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा, लातूर येथे बदली.
- – संदीप जाधव – प्रतीक्षाधीन असलेल्या अधिकाऱ्यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा येथे नियुक्ती.
- – मीना मखवाना – अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण यांची पोलीस उपायुक्त, परिमंडळ १, ठाणे शहर येथे नियुक्ती.
- – वैशाली ईश्वर कडुकर – अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांची पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे नियुक्ती.
- – चेतना तिडके – अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई यांची पोलीस अधीक्षक (अभियान), अमली पदार्थ विरोधी पथक, नागपूर येथे नियुक्ती.
- – जयंत बजबळे – पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे यांना प्रतीक्षाधीन ठेवण्यात आले आहे.
- – सूरज गुरव – पोलीस उपायुक्त, ठाणे शहर यांची अपर पोलीस अधीक्षक, नांदेड येथे नियुक्ती.
- – नरसिंग यादव – प्रतीक्षाधीन असलेल्या अधिकाऱ्यांची अपर पोलीस अधीक्षक, सातारा तसेच पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे येथे नियुक्ती.
- – धनंजय अनंत जाधव – सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांची पोलीस उपअधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा येथे नियुक्ती.
- – विकास संपत नाईक – पोलीस उपअधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नागपूर यांची अपर पोलीस आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई येथे नियुक्ती.
- – संकेत सतीश गोसावी – पोलीस उपअधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी येथे नियुक्ती.
- – कुमार भिकाजी चौधरी – उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा, लातूर यांची पोलीस उपअधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे नियुक्ती.
- – सुधीर पुंडलिक नांदणवार – प्रतीक्षाधीन असलेल्या अधिकाऱ्यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर, भंडारा येथे नियुक्ती.
- – संतोष वैरागडे – सहायक पोलीस आयुक्त, दहशतवाद विरोधी पथक यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगाव कॅम्प, नाशिक येथे नियुक्ती.
- – श्रीकांत चंद्रकांत कांकाळ – पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, बीड यांची पोलीस उपअधीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे नियुक्ती.
