#

Advertisement

Friday, November 13, 2026, November 13, 2026 WIB
Last Updated 2026-11-13T12:12:23Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून शरद पवार गटात मतप्रवाह ?

Advertisement

सत्तेत जाण्यावर नेत्यांमध्ये मतभेद

मुंबई : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना सध्या वेग आला आहे. दोन्ही बाजूंच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठका आणि चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, विलीनीकरणानंतर सत्तेत सहभागी व्हायचे की नाही, यावरून शरद पवार गटातच मतभिन्नता असल्याची माहिती समोर आली आहे. या मुद्द्यावर पक्षात दोन नव्हे, तर चार वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे वृत्त आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार गटातील बहुतांश ज्येष्ठ आमदार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करून सत्तेत सहभागी होण्याच्या बाजूने आहेत. त्यांच्या मते, दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर सत्तेत जाण्याचा पर्याय स्वीकारता येऊ शकतो. दुसरीकडे, काही आमदारांचे मत वेगळे आहे. दोन्ही पक्षांचे विलीनीकरण करण्याऐवजी स्वतंत्र गट म्हणून सत्तेत सहभागी व्हावे, अशी त्यांची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विलीनीकरण आणि सत्तेत सहभाग या दोन्ही मुद्द्यांवर पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे.या चर्चेत आमदार रोहित पवार यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सत्तेत सहभागी होण्यास त्यांचा विरोध आहे. आमदार रोहित पाटील यांचाही सत्तेत जाण्याबाबत आक्षेप असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पक्षाच्या विलीनीकरणाबाबत पक्ष जो अंतिम निर्णय घेईल, तो मान्य असेल, अशी भूमिका रोहित पाटील यांनी घेतल्याची माहिती आहे.
अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती. त्या काळात यासंदर्भात १७ बैठका झाल्याचे सांगितले जाते. त्यावेळी विलीनीकरणाच्या प्रक्रियेत शरद पवार सक्रिय नसतील, अशी भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. आताही विलीनीकरणाची चर्चा सुरू असली, तरी एनडीएसोबत सत्तेत सहभागी होण्याच्या निर्णय प्रक्रियेत शरद पवार यांचा सहभाग असेल की नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, त्यांनी अद्याप या विषयावर कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नसल्याची माहिती आहे. तसेच आमदारांशीही याबाबत चर्चा झालेली नसल्याचे सांगितले जात आहे.