#

Advertisement

Wednesday, November 4, 2026, November 04, 2026 WIB
Last Updated 2026-11-04T16:41:15Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

गोकुळबाबत महायुतीची चक्रावणारी खेळी

Advertisement

सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडले 

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीपासून सुरु झालेले राजकारण अजूनही थांबायला तयार नाही. या निवडणुकीचा प्रचार, मतदान आणि मतमोजणी तिन्ही टप्प्यात प्रचंड चुरस पाहायला मिळायला होती. या निवडणुकीत सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्त्वाखालील समविचारी आघाडीने 13 विरुद्ध 12 अशा फरकाने महायुतीचा पराभव केला होता. मात्र, या काठावरच्या बहुमतामुळे आता गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचंड चढउतार पाहायला मिळत आहेत. आता या सगळ्या घडामोडी सुरु असताना महायुतीकडून एक मोठा डाव टाकला जाण्याची शक्यता आहे. गोकुळ दूध संघावर चार शासकीय सदस्यांबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. शासकीय सदस्यांना अध्यक्ष निवडीत मतदानाच्या अधिकाराबाबत वटहुकूम काढला जाण्याची शक्यता आहे. हे चार शासकीय सदस्य महायुतीच्या विचारांचे असल्यास गोकुळची सत्ता ही महायुतीच्या ताब्यात जाऊ शकते. त्यामुळे आता गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरुनही प्रचंड रंगतदार राजकारण पाहायला मिळणार आहे.
गोकुळच्या अध्यक्ष निवडीच्या पहिल्या सभेपासून जी शक्यता व्यक्त केली जात होती ती आता खरी ठरणार आहे. शासकीय सदस्यांना निवड करायची , त्यांना मतदान अधिकार द्यायचा आणि सतता बाजूने घ्यायची, असा महायुतीचा प्रयत्न होता. त्याचदृष्टीने आता पावले टाकली जात आहेत.  त्यासाठी गोकुळवर चार शासकीय संचालकांची निवड केली जाणार आहे. शासकीय सदस्यांमध्ये शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफ आणि अशोक फराकटे यांची नाव निश्चित करण्यात आली आहे. तर चौथे नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन ठरवले जाईल, अशी माहिती आहे. या चार शासकीय सदस्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीच्या बाजूने मतदान केल्यास गोकुळची सत्ता महायुतीच्या ताब्यात जाईल.
प्रचलित सहकार कायद्यानुसार शासकीय सदस्यांना मतदानाचा अधिकार नाही. मात्र, सरकार वटहुकूम काढून हा शासकीय सदस्यांनाही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देऊ शकते. तसे झाल्यास महायुती गोकुळची सत्ता स्वत:कडे खेचण्यात यशस्वी ठरेल. गोकुळच्या निवडणुकीत समविचारी पॅनेलचे 13 आणि महायुतीच्या पॅनेलचे 12 संचालक निवडून आले होते. सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला काठावरचे बहुमत मिळाले होते. मात्र, कोरम पूर्ण करायला 14 संचालक लागतात. समविचारी आघाडीकडे 1 संचालक कमी असल्याने महायुतीने त्याचा फायदा घेतल्याचे दिसत आहे.